सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डच्या (सेना) संघावर एक वर्षाच्या बंदीची कारवाई भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केली आहे. सेनेच्या संघाने श्रीनगरमध्ये खेळण्यास नकार दिला होता. यामुळे या संघास रणजी स्पर्धेतून बाहेर करण्यात आले होते.
सेनाचा संघाचा मंगळवारपासून (ता.तीन) जम्मू व काश्मीर संघाशी चार दिवशीय सामना होणार होता. परंतु हा सामना खेळण्यासाठी सेनाचा संघ श्रीनगरला पोहचला नाही. यामुळे जम्मू काश्मीर संघाला बाय देण्यात आले असून सेनेच्या संघाला स्पर्धेतून बाहेर करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. त्यानंतर सेनेच्या संघावर वर्षभर रणजी ट्रॉफी खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे.