ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | चॅम्पियन्स करंडक-09 | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » आफ्रिदीचे युनूसकडून कौतूक
Feedback Print Bookmark and Share
 
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अष्टपैलू कामगिरी केल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार युनूस खान याने शाहिद आफ्रिदीचे कौतूक केले आहे. पाकने या सामन्यात न्यूझीलंडवर 138 धावांनी विजय मिळविला होता.

सामन्यात आफ्रिदीने 50 चेंडूत 70 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजीतही दोन विकेट घेतल्या. त्याबद्दल बोलताना युनूस म्हणाला की, आफ्रिदी एक जबरदस्त खेळाडू आहे. मागील काही वर्षांमध्ये त्याने गोलंदाजीत कमालीची सुधारणा केली आहे. तसेच त्याची फलंदाजी अफलातून आहे. पहिल्या दहा षटकांमध्ये आम्ही संकटात होतो. परंतु आफ्रिदी आणि कामरानच्या जोडीने त्यातून बाहेर काढले.
संबंधित माहिती शोधा