कर्णधार युनूस खानने यूटर्न घेत पुन्हा ट्वेंटी-20 क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केल्याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) आणि काही माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानने यावर्षी जुलैमध्ये ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर युनूसने ट्वेंटी-20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तसेच आपण या क्रिकेटच्या प्रकारासाठी वयाने मोठे असल्याचे सांगितले होते; मात्र आता त्याने पुन्हा ट्वेंटी-20 क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
पीसीबीने शाहीद आफ्रिदीला पुढील वर्षी वेस्ट इंडिजमध्ये होणार्या विश्वचषकासाठी ट्वेंटी-20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्त केले आहे. युनूस खान संघामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान क्रिकेट एवढ्या मोठ्या संकटातून गेल्यानंतर एवढ्यातच अशा वक्तव्याची गरज नव्हती, असे पीसीबीच्या एका अधिकार्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.