इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाइट रायर्डस (केकेआर) संघाचा कर्णधारपद सौरव गांगुलीकडे देण्यात आले आहे. आयपीएलच्या पहिल्या सत्रातही गांगुली कर्णधार होता.
आयपीएलच्या दुसर्या सत्रात गांगुली आणि प्रशिक्षक जॉन बुकानन यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. यामुळे गांगुलीकडून कर्णधारपद काढून न्यूझीलंडच्या ब्रॅण्डन मॅकलम याला देण्यात आले होते. त्यानंतर केकेआरची कामगिरी खालवल्याने बुकानन यांची प्रशिक्षकपदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती.