भारतीय क्रिकेट संघातील कोहिनूर असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 17 हजार धावांचा टप्पा पार केल्याने भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.
सचिनच्या या खेळीला गावस्कर यांनी वन डे सामन्यात सर्वश्रेष्ठ खेळी असे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाने ठेवलेले विशाल लक्ष्य गाठण्यासाठी मैदानावर फटकेबाजी करणार्या सचिनच्या चेहर्यावर थोडाही तनाव दिसत नव्हता.