ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्या सात सामन्यांच्या मालिकेत 3-2 ने पिछाडीवर असलेल्या भारताला रविवारी होणारा सामना जिंकावा लागणार आहे. 'जिंका किंवा मरा' अशी परिस्थिती असणारा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न टीम इंडिया करणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सात सामन्यांची मालिका जिंकण्यासाठी रविवारी गुवाहाटीत होणारा आणि त्यानंतर मुंबईत होणारा शेवटचा सामना भारताला जिंकावाच लागणार आहे. दुखापतीने त्रस्त असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने महेंद्रसिंह धोनीच्या टीम इंडियाला चांगले आव्हान दिले आहे. विजयाजवळ पोहचलेल्या भारताला पराभूत करण्यात ऑस्ट्रेलियास यश आल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.