ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | चॅम्पियन्स करंडक-09 | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » केकेआरला नव्या उंचीवर नेणार - गांगुली
Feedback Print Bookmark and Share
 
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) तिसर्‍या सत्रासाठी कोलकाता नाइट रायडर्सचे (केकेआर) कर्णधारपद मिळाल्यानंतर सौरव गांगुलीने नवे प्रशिक्षक डेव्ह व्हॉटमोर यांच्याबरोबर काम करुन संघाला नव्या उंचीवर नेणार असल्याचे सांगितले. अभिनेता शाहरुख खान मालक असलेल्या केकेआरची धुरा दुसर्‍यांदा गांगुलीकडे आली.

गांगुलीने सांगितले की, संघात नवीन नियुक्यांनंतर नवी रणनीती तयार केली जाणार आहे. नवनियुक्त सदस्यांबरोबर काम करत संघास नव्या शिखरावर नेणार आहे.

केकेआरने व्हॉटमोर यांना आयपीएलच्या तिसर्‍या सत्रासाठी नुकतीच नियुक्ती केली. सहाय्यक प्रशिक्षक म्हणून दिल्लीचे माजी यष्टिरक्षक विजय दहिया तर वसीम अक्रम याची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एंड्रयू लीपस फिजिओ तर एड्रियन ली रूक्स ट्रेनर असणार आहे.
संबंधित माहिती शोधा