पाकचा 64 धावांनी पराभव

अबूधाबी, शनिवार, 7 नोव्हेंबर 2009( 15:09 IST )
यष्टिरक्षक ब्रॅडन मॅकलमच्या शतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीमुळे न्यूझीलंडने दुसर्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. या विजयामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. मॅकलमला सामनावीर घोषित करण्यात आले.
न्यूझीलंडन नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. मॅकलमच्या 131 धावांमुळे न्यूझीलंडने निर्धारीत 50 षटकात आठ गडी गमावून 303 धावा केल्या. 304 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानचा संघ 47.2 षटकात 239 धावांवर गारद झाला. पाककडून सलमान बट्ट 59, खालिद लतीफ 45 आणि अब्दुल रज्जाकने 35 धावा केल्या. न्यूझीलंडच्या स्कॉट स्टायरिशने तीन बळी घेतले. डेनियल विटोरी आणि काइले मिल्स यांनी दोन, दोन जणांना बाद केले. शेन बॉन्ड आणि टिम साऊथीला एक-एक बळी मिळाला.