ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | चॅम्पियन्स करंडक-09 | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » पराभवास सचिनचे ग्रह नक्षत्र जबाबदार
Feedback Print Bookmark and Share
 
हैदराबादमधील सामन्यात सचिन तेंडुलकरच्या धुवांधार 175 धावांच्या खेळीनंतर भारताला पराभव पत्करावा लागला. या पराभवाचे विश्लेषण क्रिकेट पंडितांकडून आपल्या परीने केले जात आहे. परंतु ज्योतिषींनी भारताच्या पराभवास सचिनचे ग्रह नक्षत्र जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

सचिनच्या कुंडलीत राहूमध्ये शनी आहे. जेव्हा राहूमध्ये शनी असतो तेव्हा दरिद्र योग असतो. यामुळेच मास्टर ब्लास्टर सचिन चांगल्या खेळीनंतरही सामना जिंकून देऊ शकला नाही. सचिनची रास धनू आहे. परंतु चंद्रमा वृषभ राशीत होता. सहाव्या ग्रहात चंद्रमा असला तर मेहनत तर होते परंतु त्याचे फळ मिळत नाही.

सचिनच्या कुंडलीप्रमाणे संघाची कुंडलीही विजयाकडे संकेत देत नव्हती. भारतीय संघाच्या कुंडलीत गुरुवारी चंद्रमा वृषभ राशीत होतो. परंतु कारक ग्रहाच्या राशीमध्ये मंगळ होता. यामुळे या सामन्यात भारताला शेवटच्या क्षणी पराभव पत्करावा लागला. चंद्र आणि मंगळाच्या योग झाल्यावर परिस्थितीत अचानक बदल होत असतो.
संबंधित माहिती शोधा