ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | चॅम्पियन्स करंडक-09 | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » वॉर्नची कमतरता कायम राहणार- क्रिकेट ऑस्ट्रेलिया
Feedback Print Bookmark and Share
 
ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न याने निवृत्ती घेतल्यानंतर त्याची कमतरता कोणताही खेळाडू भरु शकला नाही. भविष्यातही त्याची कमतरता आम्हाला जाणवत राहील, असे मत क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे अध्यक्ष हिल्डिच यांनी सांगितले.

सन 2006-07 मधील ऍशेस मालिकेनंतर वॉर्नने निवृत्ती घेतली. त्याच्या निवृत्तीनंतर निवड समितीने सात फिरकीपटूंना संधी दिली. त्यात स्टुअर्ट मॅकगिल, ब्यू कॉसन, कॅमरुन व्हाइट, जेसन क्रेजा, ब्रेड हॉग, नाथन हारिट्ज आणि ब्राइस मॅकगेन यांचा समावेश आहे. परंतु त्यातील एकही खेळाडू वॉर्नची कमतरता दूर करु शकला नाही. हिल्डिच म्हणाले की, ऑस्ट्रेलियन संघाची आज निर्माण झालेली खराब परिस्थिती ही वॉर्न गेल्यामुळेच निर्माण झाली आहे. त्याची कमतरता आम्ही कधी भरुन काढणार नाही, हे सत्य आहे.
संबंधित माहिती शोधा