आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 30 हजार धावांच्या शिखराजवळ पोहचलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला फलंदाज नव्हे तर गोलंदाज बनायचे होते. त्यासाठी त्याने प्रयत्नही केला होतो. परंतु ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज डेनिस लिली याने त्याची गोलंदाज बनण्याची इच्छा दाबून टाकली, नाहीतर जग फलंदाजीतील कोहिनूर हिर्याला मुकले असते.
सचिन शाळेत असताना त्याने क्रिकेटर बनण्याचा प्रयत्न सुरु केला होतो. तो चेन्नईतील एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये वेगवान गोलंदाजाचे प्रशिक्षण घेण्यासाठी पोहचला. त्यावेळी तो 13 वर्षाचा होतो. परंतु एमआरएफ पेस फाऊंडेशनच्या वेगवान गोलंदाजांना प्रशिक्षण देणार्या डेनिस लिलीने सचिनच्या कमी उंचीमुळे त्याला रिजेक्ट केले. गोलंदाज बनण्याऐवजी फलंदाज बनण्याचा सल्ला दिला.
सचिन या घटनेची आठवण सांगताना सांगितले की, वेगवान गोलंदाजाच्या ट्रायलसाठी मी एमआरएफ फाऊंडेशनला गेलो होतो तेव्हा भावाने फलंदाजीचे पॅड सोबत नेल्याचा सल्ला दिला होतो. भावाचा हा सल्ला योग्य ठरला.
लिलीचा सल्ल्याने गोलंदाज होण्याची सचिनची इच्छा दबून गेली. त्याने आपले सर्व लक्ष फलंदाजीकडे केंद्रीत केले. नेटवर तासनतास तो फलंदाजीचा सराव करीत होतो. जेव्हा तो थकून जात होता तेव्हा प्रशिक्षक रमाकांत अचरेकर एक रुपयाचा सिक्का त्याच्या स्टंप्सवर ठेवत होते. त्यानंतर जो गोलंदाज सचिनला बाद करीत होता त्याला तो रुपया मिळत होतो. जर सचिन बाद न होतो पूर्ण सत्र खेळून काढले तर तो रुपया त्याला मिळत होते. त्याच्याकडे असे 13 रुपये जमले होते. ही आपली बहुमूल्य संपदा असल्याचे तो सांगतो.