अहमदाबाद येथे भारत आणि श्रीलंके दरम्यान झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या खेळपट्टीवर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने टीका केली आहे. अहमदाबादसारख्या खेळपट्यांवर खेळून कसोटी क्रिकेट वाचवू शकत नसल्याचे त्याने म्हटले आहे.
श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना अनिर्णीत राखल्याबद्दल भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने समाधान व्यक्त केले आहे. संपूर्ण सामन्यात टीम इंडिया कधीही दबावात नव्हती, असे मत धोनीने व्यक्त केले.
भारत आणि श्रीलंकेविरुद्ध 24 नोव्हेंबरपासून सुरु होणार्या कसोटी सामन्याची तयारी जोरात सुरु आहे. स्टेडियमच्या जवळपास फिरणार्या बेवासर कुत्र्यांना पकडण्याची मोहीम महानगरपालिकेने सुरु केली आहे. जिल्हा प्रशासनाने स्टेडियमवरील मधमाश्यांचे पोळ काढण्यास सुरवात केली आहे.