विक्रमदित्य सचिनने आपल्या विक्रमानंतर आपल्या चाहत्यांचे आभार मानले असून, आपला विक्रम आई-वडिलांना समर्पित केला आहे.
सचिनने आज मोहलीत सुरेख खेळ केला. वेस्टइंडिजचा फलंदाज ब्रायन लारा याचा कसोटीत सर्वोच्च धावा काढण्याचा विक्रम मोडत नवा विक्रम आपल्या नावावर प्रस्थापित केला. यानंतर त्याने आपल्या चाहत्यांना आणि कुटुंबीयांना याचे सारे श्रेय दिले आहे.
आपल्या कुटुंबीयांनी आणि चाहत्यांनी आपल्याला वेळोवेळी समर्थन दिल्याने आणि प्रोत्साहन दिल्यानेच आपण इथपर्यंत मजल मारू शकल्याचे सचिन म्हणाला. |