मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > सचिन तेंडुलकर > दीर्घ करीयरचाही 'विक्रमादित्य'
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
दीर्घ करीयरचाही 'विक्रमादित्य'
भाषा
'क्रिकेटचा देव' मानला जाणारा सचिन तेंडूलकर गेली तब्बल साडे एकोणीस वर्षे मैदानात अविश्रांतपणे खेळतो आहे. भारतातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक काळ खेळण्याचा विक्रमही आता त्याच्या नावे झाला आहे.

विक्रमांच्या राशी रचणार्‍या सचिनच्या नावे मात्र सर्वाधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा जागतिक खेळाडू हा विक्रम होण्याची शक्यता कमी दिसतेय. कारण त्यासाठी त्याला अजून ११ वर्षे खेळावे लागेल आणि ते शक्य होईल असे वाटत नाहीये.

सचिनने आतापर्यंत साडे एकोणीस वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घालवली आहेत. हा भारतातर्फे विक्रम आहे. भारतातर्फे असलेला दीर्घ आंतरराष्ट्रीय करीयरचा विक्रम त्याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इंग्लंडविरोधात चेन्नईमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मोडला होता. यापूर्वी हा विक्रम लाला अमरनाथ यांच्या नावावर होता. त्यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट करीयर १९ वर्षे एवढे होते.

सचिनने आपला आतापर्यंतचा शेवटचा सामना न्यूझीलंडविरोधात वेलिंग्टन येथे सात एप्रिलला खेळला होता. त्या दिवसापर्यंत त्याचे आंतरराष्ट्रीय करीयर १९ वर्षे १४३ दिवस एवढे भरते. त्याने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १५ नोव्हेंबर १९८९ मध्ये पाकिस्तानविरोधात कराचीमध्ये खेळला होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दीर्घ करीयरचा विक्रम इंग्लंडच्या विल्फ्रेड रोड्स यांच्या नावे आहे. रोड्स महाशय यांनी पहिला कसोटी सामना १ जून १८९९ मध्ये व अंतिम सामना वयाच्या ५१ व्या वर्षी १२ एप्रिल १९३० मध्ये खेळला होता. याचा अर्थ त्यांचे आंतरराष्ट्रीय करीयर ३० वर्षे ३१५ दिवसांचे होते. हा विश्वविक्रम आहे. तिथपर्यंत पोहोचणे आता कोणत्याही खेळाडूसाठी जवळपास अशक्य आहे.

दीर्घ करीयर केलेल्यांच्या यादीत सचिनचा क्रमांक २३ वा आहे. जॅक हॉब्ज, इमरान खान, गॅरी सोबर्स, डॉन ब्रॅडमन, ग्रॅहम गूच हे खेळाडू त्याच्या पुढे आहेत. पण या सगळ्यांना मागे टाकून सचिन पहिल्या दहामध्ये सहज जाऊ शकतो. पण इंग्लंडच्या डी. बी. क्लोज (२६ वर्षे ३५६ दिवस), फ्रॅंक वुली (२५ वर्षे १३ दिवस) यांच्यापर्यंत त्याला पोहोचणे अशक्य दिसतेय.

भारताकडून दीर्घ आंतरराष्ट्रीय कारकिर्द घडविणार्‍या खेळाडूंमध्ये सचिननंतर लाला अमरनाथ, त्यानंतर एस. वेंकटराघवन (१८ वर्षे २१४ दिवस), अनिल कुंबळे (१८ वर्षे ८५ दिवस), मोहिंदर अमरनाथ (१८ वर्षे ३६ दिवस), सी. के. नायडू (१८ वर्षे ९ दिवस), विजय मर्चंट (१७ वर्षे ३२७ दिवस) यांचा समावेश आहे.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
लिटील मास्टरचा आज वाढदिवस
हल्‍ला मुंबईवर नव्‍हे देशावरः सचिन
वडापावाइतकेच अविभाज्य सचिन- विनोद
एका खेळीयाने
सचिन केवळ विक्रमासाठीच खेळतो?
विक्रम आई-बाबांना समर्पित- सचिन