मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > आयपीएल लीग > लेख
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
आयपीएलः कॉर्पोरेट कंपन्यांचा धंदा?
- अभिनय कुलकर्णी

vijay mallay
ND
या स्पर्धेतील बंगलोर, हैदराबाद आणि मुंबई हे तिन्ही संघ सुरवातीला तगडे मानले जात होते. कारण या तिन्ही संघात तसे खेळाडूही आहेत. पण तिन्ही संघांची कामगिरी निराशाजनक झाली आहे. सहाजिकच त्याचे परिणामही आता दिसू लागली आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांनी या खेळाडूंवर कोट्यावधी पैसे लावले आहेत. त्यांच्यासाठी मोठी एड कॅंपेनही केली. त्यासाठी बॉलीवूडच्या तार्‍यांना आणून नाचवलं. तरीही संघात जोश येत नाही. म्हटल्यावर काय करणार. मग लिकरकिंग मल्ल्यांनीच आपल्या कॉर्पोरेट संस्कृतीला साजेल असे 'हायर अँड फायर' पाऊल उचलले आणि चारू शर्मा व व्यंकटेश शर्मा यांची गच्छंती झाली. आता सीईओपदी ब्रिजेश पटेल या माजी क्रिकेटपटूची नियुक्ती केली असून त्याच्यामुळे तरी संघाची कामगिरी सुधारेल अशी आशा आहे.

हैदराबादमध्ये तर ट्वेंटी-२० स्पर्धेचा हुकमी एक्का एडम गिलख्रिस्ट आहे. तरीही या संघाने पराभव पाहिले. त्यात व्ही.व्ही.एस. हा संघाचा कर्णधार. या बापड्याने कधीच कर्णधारपद भूषवले नव्हते. त्यात ट्वेंटी-२० क्रिकेट आणि त्याची शैली यांचा मेळ कुठेही बसणारा नव्हता. तरीही त्याला कर्णधार केले. अशावेळी पराभव पहावा लागणार नाही तर काय? या पराभवाला कंटाळल्यामुळेच की काय पण त्याला परवाच्या चेन्नई सुपर किंग्जविरूद्धच्या सामन्यात बाजूला बसवले होते. आणि संघाला चक्क विजय मिळाला.

या सगळ्यांचा मतितार्थ एकच आहे. हे कॉर्पोरेट वॉर आहे. इथे प्रत्येकाला विजय हवा. आम्ही पैसे मोजले आहेत. आम्हाला विजय पाहिजे आहे. मग तुम्ही काहीही करा. एवढेच त्यांचे म्हणणे आहे. यामुळे क्रिकेट लहान ठरले आहे. खेळाडू लहान ठरले आहे. कॉर्पोरेट मंडळी मात्र मोठी झाली आहेत. विजय खेळाडूंचा नव्हे, तर या कॉर्पोरेट मंडळींच्या फ्रॅंचाईझींचा होतो आहे.

  या सगळ्यांचा परिणाम 'क्रिकेट' नावाच्या खेळावर मात्र विपरीत होऊ शकतो. कारण सतत चांगली कामगिरी करायच्या दबावामुळे कामगिरी खालावली तर खेळाडूंचा आत्मविश्वास खच्ची होऊ शकतो.      
मल्ल्यांनी आतापर्यंत बिझनेसमध्ये कधी पराभव पाहिलेला नाही. त्यांना हवे ते त्यांनी मिळवले. मग त्यासाठी वाट्टेल ते पैसे का लागेनात. फॉर्म्युला वन स्पर्धेतही म्हणूनच ते उतरले. तिथेही त्यांच्या फोर्स वन संघाने नुकतीच चांगली कामगिरी केली आहे. पण क्रिकेटमध्ये मात्र ते साफ अपयशी ठरले. त्यामुळे त्याचा राग त्यांना या दोघांच्या हकालपट्टीतून काढल्याचे बोलले जाते.

पण क्रिकेट हा खेळ आहे. इथे जय पराजय होतच असतात हे या कॉर्पोरेट मंडळींनी समजून घ्यायला हवे. सततच्या पराभवानंतरही विजयाची पहाट उगवतच असते. कोणताच संघ सलग जिंकू शकत नाही. कारण जय पराजय हाच तर खेळाचा नियम असतो. पण या कॉर्पोरेट मंडळींना आता क्रिकेटपटूंना आपल्या पद्धतीप्रमाणे 'पिळून' काढायला सुरवात केली आहे. त्यांची कामगिरी जेवढी चांगली होईल, तेवढे त्यांना हवे आहे. त्यापुढे तो क्रिकेटपटू, त्याची करीयर हे सगळे गौण आहे. या सगळ्यांचा परिणाम 'क्रिकेट' नावाच्या खेळावर मात्र विपरीत होऊ शकतो. कारण सतत चांगली कामगिरी करायच्या दबावामुळे कामगिरी खालावली तर खेळाडूंचा आत्मविश्वास खच्ची होऊ शकतो. त्याचवेळी चांगला खेळ करायचा तर आयपीएलमध्ये करावा. कारण तिथे पैसे मिळतात. देशासाठी खेळण्यापेक्षाही जास्त पैसे मिळतात. ही भावना रूजली तर मग देशापेक्षाही आयपीएल मोठी होऊ शकते, हा धोका आहे.

त्याचवेळी क्रिकेटपटूंनीही स्वतःला ओळखायला हवे. ट्वेंटी-२० च्या क्रिकेट संघातही ज्या लक्ष्मणची निवड झाली नव्हती, तो एका संघाचा कर्णधार कसा काय होऊ शकतो? त्याचा खेळ आणि ट्वेंटी-२० यांचा दुरान्वयेही संबंध नाही. याचा अर्थ तो 'गया गुजरा' खेळाडू नाही. कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे स्थान कुणीही नाकारणार नाही. पण म्हणून ट्वेंटी-२० त्याने उतरावे याचेच आश्चर्य वाटते. तीच कथा राहूल द्रविडची. राहूलचा खेळही ट्वेंटी-२० ला साजेसा नाही. तरीही तो कर्णधार आहे. अशा वेळी मग या खेळाडूंकडून अपेक्षित ती कामगिरी कशी होणार?

.....आयपीएलच्या खेळाडूंसाठी बोली लावली जात असताना या क्रिकेटपटूंना पैसे दिसले होते. आता या पैशांमागची स्पर्धा आणि विजयाचा हव्यासही दिसला असेल.
<< 1 | 2 
आणखी
आयपीएलः सेमीफायनलमध्ये कोण जाणार?
आयपीएल'वर प्रभाव ऑस्ट्रेलियाचाच
सचिन: महान खेळाडू
'लिकरकिंग' विजय मल्ल्या
बॉलीवूडचा 'किंग' शाहरूख खान
बॉम्बे डाईंगचा तरूण सूत्रधार