मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > आयपीएल लीग > बातम्या
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
विजय मल्ल्यांचा द्रविड, चारूवर हल्लाबोल
भाषा
इंडियन प्रिमियर लीगमध्ये झपाटून मार खाल्लेल्या बंगळूर रॉयल चॅलेंजर्समधील अंतर्गत वाद बाहेर आले असून संघाचे मालक विजय मल्ल्या यांनी खेळाडूंच्या निवडीबाबत कर्णधार राहुल द्रविड व बडतर्फ करण्यात आलेला कार्यकारी अधिकारी चारू शर्मा यांच्यासोबत मतभेद होते, असे स्पष्ट केले आहे.

ट्वेंटी-20 मध्ये कसोटी संघ म्हणून संभावना करण्यात येत असलेल्या संघाबाबत आपण समाधानी नाही. आपल्या पसंतीच्या खेळाडूस वगळून द्रविड व चारू शर्मा यांनी त्यांच्या पसंतीच्या खेळाडूंचा भरणा संघात केला. निवडक खेळाडूंची आपली यादी होती, मात्र द्रविड व चारू यांचीही यादी असल्याचे शेवटी आपण माघार घेतल्याचे मल्ल्या यांनी एनडीटीव्हीस सांगितले.

काही खेळाडूंचा संघात घ्यायची आपली इच्छा होती, मात्र त्यांनी आपणास तसे करू न दिल्याने ही परिस्थिती ओढवली. दुसर्‍या बोलीच्या वेळेस द्रविड नसतानाही चारूने त्यांच्या पसंतीचे खेळाडू निवडण्यापासून परावृत्त केले.

चारू शर्माची हकालपट्टी करण्याबाबत ते म्हणाले की, त्यास क्रिकेटचे ज्ञान असून संघाची गुणवत्ता वाढवण्यासोबतच संपूर्ण रॉयल चॅलेंजर्स उपक्रमास पुढे नेतील याबाबत विश्वास होता मात्र विपरित घडल्याचे ते म्हणाले.


आणखी
सचिन चेन्नईविरूद्ध खेळण्याची शक्यता
हरभजनवर कायमची बंदी?
चेन्नईचा दिल्लीवर रोमांचकारी विजय
युनूसखानही राजस्थान रॉयल्समध्ये
प्रसादवर पूर्णं विश्वास आहे- मल्या
मुंबईने रोखला राजस्थानचा 'विजयरथ'