| | बिजींग ऑलम्पिकमध्ये फ्रीस्टाइल कुस्तीत कांस्य पदक जिंकून नवा इतिहास घडविणा-या पैलवान सुशील कुमारने सोमवारी रात्री भारतीय भूमीवर पाऊल ठेवताच 2012 च्या लंडन ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणे हे आपले लक्ष्य असणार असल्याचे जाहीर केले आहे.आपण याच ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. परंतु आपल्याला यात यश न मिळाल्याचे कबुल करतानाच सुशिलने पुढील ऑलिंपिकमध्ये आपण पदक मिळवणारच असे ठणकावून सांगीतले आहे. |