मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > बिजिंग ऑलिंपिक 2008 > ऑलिंपिक बातम्या > ऑलिंपिकमध्येही सानियावर संकट
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
ऑलिंपिकमध्येही सानियावर संकट
वार्ता
काही दिवसांपासून संकटात सापडलेली सानिया बिजींग ऑलिंपिकमध्येही अडचणीत आली आहे. तिची जागतिक क्रमवारी घसरत असतानाच आता ऑलिंपिकसाठी काढण्यात आलेल्या ड्रॉमध्ये तिला कठिण ड्रॉ निघाला असून, तिला आता जागतिक क्रमवारीत 56 क्रमांकावर असलेल्या चेक गणराज्याच्या इवेता बेनसोवाशी दोनहात करावे लागणार आहेत.

दुसरीकडे जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महेश भूपती आणि लिएंडर पेस यांना मात्र प्रवेशासाठी फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत.

महिला एकेरीत सानिया चमकदार खेळ करेल अशी आशा तिच्या चाहत्यांना आहे. परंतु आता पहिल्या फेरीपूर्वीच तिला इवेनाशी झुंजावे लागणार असल्याने या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सानियाला ऑलिंपिक विजयाचे आपले स्वप्न पूर्णं करायचे असेल तर तिला या सामन्या विजय मिळवावाच लागणार आहे. दुसऱ्या फेरीत ति यशस्वी ठरली तर तिला सीडनीत विजय मिळवणाऱ्या व्हिनस विल्यमशी लढत द्यावी लागणार आहे.
आणखी
प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना ऑलिंपिक चटका
ऑलिंपिक तिकिटाच्या नावावर फसवणूक
ऑलिंपिकच्या यशस्वितेसाठी दलाईंचे अभीष्टचिंतन
302 सुवर्ण पदकांसाठी 205 देशांची टक्कर
लवकरच फिट होईन- टायसन
ऑलिंपिकमध्ये भारतीय हॉकी संघाची अनुपस्थिती