मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > बिजिंग ऑलिंपिक 2008 > ऑलिंपिक बातम्या > अभिनववर शुभेच्छा आणि बक्षिसांचा वर्षाव
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अभिनववर शुभेच्छा आणि बक्षिसांचा वर्षाव
वेबदुनिया
बीजिंग ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदाच भारताला सुवर्ण पदकाची चव चाखवणाऱ्या अभिनव बिंद्रावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

देशातील विविध राज्यांनी त्याला शुभेच्छा देतानाच त्याच्यावर बक्षीसांचा वर्षावही केला आहे. यात पंजाब सरकार अग्रेसर असून, मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी त्याला एक कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. बिहार सरकारनेही बिंद्राला 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

महाराष्ट्र सरकारनेही बिंद्राच्या या अभिनव कामगिरी बद्दल त्याचे कौतुक केले असून, त्याला 10 लाख रुपयांचा पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे. मध्य प्रदेशामधील भाजप सरकारनेही अभिनवला पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

चंदिगड मधील अभिनवच्या घराबाहेर सध्या क्रीडा प्रेमी आणि त्याला शुभेच्छा देणाऱ्या त्याच्या चाहत्यांचा रांगा लागल्या आहेत.

संपूर्ण देशातून त्याच्या या कामगिरीचे कौतुक केले जात असून, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनीही अभिनवला आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी
चीन अमेरिकेचा सापशिडीचा खेळ
बिंद्राचा 'अभिनव' पराक्रम, सुवर्ण भारताचे
निशानेबाजी आणि तिरंदाजीत निराशा
सायना प्री क्वार्टरफाइनलमध्‍ये
बिजींगमध्‍ये अमेरिकन पर्यटकाची हत्या
मोनिका डोपिंग आरोपातून मुक्‍त, बिजींग जाणे अशक्‍य