मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > बिजिंग ऑलिंपिक 2008 > ऑलिंपिक बातम्या > मनदीप कौरची निराशाजनक कामगिरी
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मनदीप कौरची निराशाजनक कामगिरी
वार्ता
ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंची एथेलेटिक्समधील निराशाजनक कामगिरी दुसर्‍या दिवशीही सुरूच राहिली. डिस्कस थ्रो स्पर्धेत विकास गौडा फायनलमध्ये जाऊ शकला नाही. त्याचवेळी महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताची मनदीप दौर उपांत्य फेरीत स्थान मिळवू शकली नाही.

पंजाबच्या मनदीपने ५२.८८ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. ती स्वतःचीच राष्ट्रीय कामगिरी (५१.७४) गाठू शकली नाही. ५० धावपटूंमध्ये ती ३३ व्या स्थानावर राहिली. त्याचवेळी हीटमध्ये ती सातपैकी सहाव्या स्थानावर राहिली.

शुक्रवारपासून सुरू झालेल्या एथेलेटिक्स स्पर्धांत भारतीय एथलिट्सची कामगिरी निराशाजनक झाली आहे. प्रीजा श्रीधरन (१००० मीटर), हरवंत कौर, कृष्णा पुनिया व विकास गौडा (सर्व डिस्कस), मनदीप कौर (शंभर मीटर) या सगळ्यांनी निराशाजनक कामगिरी केली आहे.
आणखी
फेल्प्सचे सातवे सुवर्ण, विश्वविक्रमाशी बरोबरी
मुष्टियोद्धा जितेंद्र कुमारही उपांत्यपूर्व फेरीत
टेनिसमध्ये पदकाची आशा फोल; पेस-भूपती पराभूत
मुष्टियुद्धात अखिल कुमारने जगज्जेत्याला हरवले
फ्लेप्स बनला ऑलिंपिक पुरुष
नेमबाजीतले भारताचे आव्हान संपुष्टात