आशियाई इनडोअर मैदानी स्पर्धेत भारताने एक सुवर्ण, तीन रजत आणि तीन कास्य पदक पटकविले. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताला दोन पदक मिळाले. भारताच्या महिलांनी चारशे मीटर रिले शर्यतीत रौप्यपदक मिळविले. तर दुसरे पदक लांब उडीत मिळाले.
स्पर्धेत महाराष्ट्रातील प्रतिक्षा शिंदे हिने एक सुवर्ण आणि तीन रजत पदक मिळविले. प्रतीक्षाबरोबर, राहुल कुमार, शशांक बजरंग काथाडे आणि देवराव शंकरराव यांना रजत पदक मिळाले. शेवटच्या दिवशी रिलेमध्ये कझाकस्तानने सुवर्ण, तर थायलंडने कास्य पदक मिळविले. भारतीय पुरुष संघाला मात्र चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. लांब उडीत भारताच्या प्रजुशाने 6.27 मीटर उडी मारून कास्य पदकाची कमाई केली. कझाकस्तानची ओलारयापाकोवा हिने सुवर्ण, तर उझबेकिस्तानच्या युलिया तारासोवा हिने रौप्यपदक मिळविले.