क्रीडा वृत्त | ओळख खेळाडूंची | लेख
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » इतर खेळ » क्रीडा वृत्त » प्रकाश अमृतराजची विजयी सलामी
Feedback Print Bookmark and Share
 
दक्षिण कोरियामध्ये सुरू असलेल्या एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेतील एकेरीत प्रकाश अमृतराज याने विजयी सुरवात केली. त्याने कोरियाच्या कियू टाए इम याच्यावर 7-6, 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात केली.

जागतिक क्रमवारीत प्रकाश 223 व्या, तर कियू 165 व्या क्रमांकावर आहे. पहिला सेटमध्ये कियूने चांगला संघर्ष केला. हा सेट 'टायब्रेक'मध्ये गेला. त्यात प्रकाशने बाजी मारली. त्यानंतर दुसर्‍या सेटच्या दुसर्‍या गेममध्ये प्रकाशने दोन ब्रेक पॉइंट वाचविले. त्यानंतर दुसरा सेट सहज जिंकून दुसर्‍या फेरीत प्रवेश केला.
संबंधित माहिती शोधा