मुंबईत राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्याचा आपला प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने फेटाळून लावला. ही स्पर्धा मुंबईत आयोजित न केल्याबद्दल आपल्याला दु:ख झाल्याचे राष्ट्रकुल स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी सांगितले.
मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना श्री.कलमाडी यांनी सांगितले की, राष्ट्रकुलसंदर्भात महाराष्ट्र सरकारने सकारात्मक धोरण स्वीकारले नाही. अन्यथा परिस्थिती वेगळी राहिली असती. मुंबईत क्रीडा स्पर्धांसाठी पायाभूत सुविधा नव्हत्या. त्या सर्व राष्ट्रकुलच्या माध्यमातून निर्माण झाल्या असत्या. परंतु सरकारने आपला प्रस्ताव फेटाळल्यामुळे स्पर्धा मुंबईत आयोजित करता आली नाही, असे त्यांनी सांगितले.