क्रीडा वृत्त | ओळख खेळाडूंची | लेख
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » इतर खेळ » क्रीडा वृत्त » राष्ट्रकुलमधील भ्रष्टाचार रोखवा- मल्होत्रा
Feedback Print Bookmark and Share
 
विदेशातून उपकरण खरेदीच्या नावाखाली राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीत भ्रष्टाचार होवू शकेल. हा भ्रष्टाचार थांबविला गेला पाहिजे, असे मत भारतीय ऑलिंपिक संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा यांनी व्यक्त केले.

श्री.मल्होत्रा यांन सांगितले की, राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सुरु झाला आहे. तसेच ज्या पद्धतीने मैदाने तयार होण्यास उशीर होत आहे, त्यामुळे आरोपात तथ्थ वाटत आहे. स्पर्धेच्या तयारीस जितका उशीर होईल तितके त्याचे खर्च वाढणार असून भ्रष्टाचारही वाढणार आहे.

राष्ट्रकुलसाठी खर्च होणारा पैसा हा जनतेचा आहे. यामुळे हा पैसा कसा खर्च होत आहे, याची माहिती जनतेला झाली पाहिजे. तसेच गुणवत्ताचा स्तरही तपासून घेतला पाहिजे, असे मल्होत्रा यांनी सांगितले.
संबंधित माहिती शोधा