क्रीडा वृत्त | ओळख खेळाडूंची | लेख
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » इतर खेळ » क्रीडा वृत्त » मेरी कोम, कविताला सुवर्णपदक
Feedback Print Bookmark and Share
 
आशियाई इनडोअर गेम्समधील महिलांच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या मेरी कोम आणि कविता कुमारी यांनी सुवर्णपदक पटकविले. स्पर्धेत भारताला दोन सुवर्ण आणि दोन रजत पदक मिळाले. सरिता देवी आणि एन उषा यांनी अनुक्रमे 54 व 57 किलोग्रॅममध्ये रजत पदक मिळविले.

मेरी कोमने 46 किलो गटात होआ गुयेन हिच्याकडून मिळालेले कडवे आव्हान परतून लावले. तिने अंतिम फेरीत 8-6 असा विजय मिळविला. 64 किलोच्या गटात कविताने कजाखस्तानच्या खासेनोवा साइडा हिचा 8-4 असा सहज पराभव करीत भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. परंतु सरिता देवी हिचा चीनच्या झांग किनने पराभव केल्यामुळे तिला रजत पदकावर समाधान मानावे लागले. तर उषाला थायलंडच्या लोपिम पिमाविलीने पराभूत केले.
संबंधित माहिती शोधा