भारताचा जलतरणपटू वीरधवल खाडेने इनडोर आशियाई जलतरण स्पर्धेत शानदार कामगिरी करताना 50 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात कांस्यपदक पटकावले.
या स्पर्धेत त्याचे पहिलेच पदक ठरले आहे. खानेने अखेरच्या लढतीत 22.45 सेकंदाचा वेळ काढून तिसरे स्थान पटकावले. सुवर्णपदक कजकिस्तानच्या स्टेनिसलावने जिंकले तर उजेबेकिस्तानच्या डेनिलला रौप्यपदक पटकावले.