भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण कोरियाच्या संघाला उपांत्यफेरीत 3-2 ने टक्कर देऊन आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. या विजयाने 2010 मध्ये अर्जेंटीना येथे होणार्या विश्वचषकासाठी भारतीय संघ पात्र झाला आहे. रविवार भारत व चीन यांच्यात अंतिम सामना खेळला जाईल.
भारतीय संघातील जसजीत कौरने दोन व रानी रामपालने एक गोल करून भारताला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. भारताला प्रतिउत्तर देताना कोरियाने जोरदार उलटफेर करून दोन गोल केले.