जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या स्विझर्लंडचा रॉजर फेडरर याने सन 2012 मधील ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी त्याने पूर्णवेळ फिजिओची नियुक्ती केली आहे.
व्यावसायिक टेनिसपटू संघटनेच्या (एटीपी) मानांकनात सातव्या क्रमांकावर असलेल्या स्टेफान विवेयर यांची नियुक्ती फेडररने केली आहे. त्याने अमेरिकन खेळाडू एंडी रॉडिककडून प्रेरणा घेत पूर्णवेळ फिजिओ नियुक्त केला आहे. 15 ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकविणार्या फेडररला आता लंडन ऑलिंपिकमध्ये देशाकडून खेळायचे आहे.