बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : सोमवार, 14 जुलै 2014 (13:08 IST)

आता मिळवा धबधब्याची माहिती एका क्लिकवर

मान्सूनच्या आगमनामुळे अनेक भटके चटकन जाऊन येण्यासारख्या पावसाळी सहलींच्या नियोजनात गुंतले असतील. देशाच्या कानाकोपर्‍यात दडलेल्या निसर्गाचा खजिना धुंडाळण्याची हीच तरी योग्य वेळ असते. 
 
पावसाळय़ात नव्याने जिवंत होणारे धबधबे म्हणजे नेत्रसुखच असते. त्यांची भव्यता पाहून आपण मोहित होते. नेत्रसुखद हिरवळ, आल्हाददायक हवामान आणि त्या जोडीला हे अविस्मरणीय धबधबे. रुटीनला फाटा देऊन एका मस्ट सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी यापेक्षा वेगळे कोणते कारण असू शकेल? (हॉटेल्सडॉटकॉम) या राहण्याची ऑनलाईन सोय करणार्‍या आघाडीच्या वेबसाईटने पावसाळय़ात आवर्जून भेट देण्याजोग्या काही खास धबधब्यांची माहिती दिली आहे. इतकेच नाही गोवा, कोची आणि लोणावळय़ातल्या हॉटेल्सची तसेच प्रवासासंदर्भातील माहितीदेखील यावर उपलब्ध आहे.