शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. देश-विदेश
Written By वेबदुनिया|

गौतम बुद्धाच्या जन्मगावी

WD
गौतम बुद्धांचे जन्मस्थान लुंबिनी प्रत्यक्षात नेपाळमध्ये आहे, हे फारच थोड्या लोकांना माहिती आहे. लुंबिनीला जाण्यासाठी भारत-नेपाळच्या सीमारेषा ओलांडाव्या लागतात. अर्थात भारतीय नागरिकांना ते फारसं अवघड नसतं. पण तोही एक रोमांचक अनुभव असतो. सीमेपडलकडे भैरहवा म्हणून गाव लागते. तिथून लुंबिनी दी-एक किलोमीटवर आहे. मात्र संध्याकाळी सहानंतर हे सारे बंद होत असल्याने झपझप पोहोचावे लागते. खरं तर नेपाळच्या तराई भागातील हा एके काळचा दाट वनाचा प्रदेश आहे.

गौतम बुद्धांची माता मायादेवी हिचे माहेर देवदहनामक नगरात होते. ती आन्नप्रसव अवस्थेत असतानाच कपिल नागरीतून माहेरी जायला निघाली. रस्त्यात हे लुंबिनी वन लागले. वन अतिशय गर्द, दाट व थंडगार होते. गर्भिणी मायादेवीला इथे काहीकाळ विश्रांती घेण्याची इच्छा झाली. नागराची राणीच ती, तिला कोण अडवणार? एका शालवृक्षाखाली तिच्या विश्रांतीची व्यवस्था केली गेली. पण अघटीत घडले. राणी तिथेच प्रसूत झाली व राजकुमार सिद्धार्थचा जन्म जाला.

WD
आज हे ठिकाण मुद्दाम पर्यटकांना दाखवले जाते. तिथे आता मायादेवी मंदिर उभारण्यात आले आहे. याखेरीज इथला अशोकस्तंभ, विहार, स्तूप, पुष्करणी, रुम्मिनदेवीचे मंदिर, अभ्यास केंद्र सारंच पाहण्यासारखं आहे. एका अनोख्या अनुभूतीचा तिथे प्रत्यय येतो.

इथल्या रुम्मिनदेवी मंदिराच्या पश्चिमेला एक भला मोठा अशोकस्तंभ आहे. 13 फूट उंच व जवळजवळ सवासात फूट परिघाच्या या स्तंभावर सम्राट अशोकचा ब्राह्मी लिपीतील पाच ओळींचा लेख आहे. यातून असे समजते की, भगवान बुद्धाने इथे जन्म घेतला म्हणून सम्राट अशोकाने हे गाव करमुक्त केले व पिकाचा आठवा भाग जो राजाला मिळायचा तो या गावाला लावून दिला. पण नंतरच्या काळात केव्हा तरी मूर्तिभंजकांकडून या स्तंभाचे नुकसान केले गेले असावे, मात्र आता नेपाळ सरकारने या स्तंभाच्या दोन्ही बाजूला स्तूप बनवले आहेत. ते सुंदर आहेत. रुम्मिनदेवी मंदिराच्या समोर झाडाखाली विहाराचे अवशेषही दिसतात. इथे एक पुष्करणी दाखवली जाते. सिद्धार्थच्या जन्मानंतर इथेच त्याला पहिले स्नान घातले गेले. रुम्मिनदेवीचे मंदिर ही चांगले आहे. हे कालिमातेचे रूप आहे. तिच्या उजव्या हातात नवजात सिद्धार्थ व दुसर्‍या हाती शालवृक्षाची फांदी आहे. या देवीच्या नावावरून या गावाचे नाव लुंबिनी पडले, असे सांगितले जाते. 1896 पर्यंत हा परिसर म्हणे कुणालाच माहित नव्हता. ब्रिटिश अधिकारी फ्युहरर याला आधी तो अशोकस्तंभ व मग हा ऐतिहासिक महत्त्वाचा परिसर सापडला. आता मात्र नेपाळ सरकारने लुंबिनीच्या व्यवस्थेसाठी एक धर्मोदय सभा व एक धर्मशाळा उभारली आहे. संध्याकाळी सहापूर्वी मात्र पोहोचावे लागते. मात्र भैरहवाला जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था आहे. तिथे रात्री झोपेतही गौतमबुद्धांची शांत मूर्ती व त्यांचे ‍अहिंसेचे तत्त्वज्ञान पुन:पुन्हा डोळ्यापुढे येत राहते.