शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : बुधवार, 17 डिसेंबर 2014 (11:57 IST)

जगातील आश्चर्यकारक ठिकाणे

या पृथ्वीतलावर अनेक आश्चर्यकारक ठिकाणे आहेत. आपण पृथ्वीवरच आहोत की अन्य ग्रहावर, असे वाटण्यासारखीही काही ठिकाणे आहेत. अशाच काही आश्चर्यकारक ठिकाणांची ही माहिती....
 
1) पैमुक्कले: तुर्कीचे पैमुक्कले हे ठिकाण जितके आश्चर्यकारक आहे तितकेच ते सुंदरही आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर हे ठिकाण पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. स्व:ला रिलॅक्स करण्यासाठी यासारखे दुसरे ठिकाण नाही!
2) कोएटे बट्स: अँरिझोनामधील कोएटे हे निसर्गाचे एक लँडमार्क आहे. येथील ग्रँड कॅनियन ही खोल दरी जशी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे तसेच येथील कोएटेही पर्यटकांना खेचून घेते. येथील वाळूच्या टेकड्या हजारो वर्षांपासून अभ्या आहेत.
3) कोस्टा स्मेराल्डा: सार्डिनियामधील कोस्टा स्मेराल्डा हे ठिकाण युरोपमधील एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. येथील नौका स्पर्धाही पर्यटकांचे आकर्षण असते.

4) केयाहिकावेलो: लानाईमधील हे ठिकाण पाहिल्यावर आपल्याला वाटू शकेल की आपण परग्रहावरीलच एखाद्या ठिकाणी आलो आहोत. हे अतिशय ओसाड आणि भयावह असे ठिकाण आहे. चारही बाजूंना लाल मातीच्या टेकड्या आणि झुडपे आहेत. 

5) वुपर्टल: दक्षिण आफ्रिकेतील वुपर्टल हे ठिकाण झरे, डोंगर आणि जंगलांनी घेरलेले आहे. येथील वातावरण अतिशय शांत आहे. अनेक पर्यटक या ठिकाणी आकर्षित होत असतात. 6) प्रोव्हीडेंस कॅनन: जॉर्जियामध्ये हे ठिकाण आहे. येथील गव्हाळ रंगाचे उभे खडक एक अद्भूत दृश्य निर्माण करतात. इथे अनेक उंच आणि सडपातळ वृक्ष आहेत.


7) सोकोट्रा: येमेनमधील हे ठिकाणही परग्रहावरील वाटावे असेच आहे. ओसाड जमीन, वाळवंट आणि आळिंबीच्या आकाराची झाडे हे येथील वैशिष्ट्य.
8) लेंकोइस: ब्राझीलमधील या ठिकाणी गर्द हिरव्या रंगाचे पाणी आणि सफेद वाळूच्या टेकड्या पाहायला मिळतात. या या ठिकाणी अतिशय शांत वातावरण असते जे पर्यटाकांना लाल्हाददायक वाटते.
 
9) मेंटावाई आयलंड: सुमात्रामधील मेंटावाई बेट सर्फिंगसाठी प्रसिध्द आहे. येथील निळेशार पाणी, प्रवाळे आणि अनोखा समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करतो.
10) कोरोनेशन स्ट्रीट: जर आपल्याला जुने रस्ते आणि अरूंद गल्ल्या पाहायच्या असतील तर अमेरिकेतील प्रोव्हीडेंसमध्ये जावे. या ठिकाणी फेरफटका मारणे हा एक वेगळाच अनुभव असतो.