शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. देश-विदेश
Written By वेबदुनिया|

ट्रेकर्ससाठी कुल्लू आ‍यडियल

WD
बियास नदीचया पात्रात उत्तरेकडून दक्षिणेकडे 80 कि.मी. लांब परिसरात हे खोरं वसलयं. गिर्यारोहक, पर्यटकांसाठी ते एक आव्हानच ठरतं. स्थानिक विणकरांकडून बनवलेल्या रंगीबेरंगी शाली आणि टोप्यांसाठी कुल्लू प्रसिद्ध आहे. इथूनच 15 किलोमीटर अंतरावर विश्वेश्वर महादेवाचं म‍ंदिर आहे. हे आठव्या शतकात बांधलं गेलेलं आहे. याशिवाय कुल्लू शहर मासेमारी आणि शिकारीसाठीही प्रसिद्ध ठिकाण आहे.

कुटुंबासह, मित्रांच्या गोतावळ्यासह येते भटकंतीसाठी यावंच, पण ट्रेकर्ससाठीही हा प्रदेश आयडियल आहे. ट्रेकिंग, रॉक क्ला‍यबिंग, रिव्हर्स क्रॉसिंग याचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर कुल्लू-मनालीला यावंच. पूर्वी कुल्लू कुलंथपीठा या नावानं ओळखलं जायचं. कुल्लू दसरा या सणासाठी लोकप्रिय आहे. दसर्‍यादरम्यान इथे नृत्य, संगीत, देवदेवतांच्या पालख्या अशी धमाल असते. कुल्लूच्या शाली आणि कॅप आवर्जून खरेदी कराव्या. दिल्लीवरून पठाणकोट मार्गे कुल्लू 760 कि.मी. अंतरावर आहे.