शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. देश-विदेश
Written By वेबदुनिया|

पर्यटकांना आकर्षित करणारे 'बाली'

ND
WD
इंडोनेशिया महाद्वीपाजवळ 'बाली' जगातील सर्वात प्रसिद्ध पर्यटक स्थळापैकी एक आहे. 'बाली' हे जावा द्वीपापासून अगदी जवळ असून लोंबोक नदीच्या काठी वसले आहे. येथील बाली कला, नृत्य, प्रतिमा, चित्र, संगीत सार्‍या जगात लोकप्रिय असून पर्यटकांना आकर्षित करत असते. येथील नैसर्गिक सौंदर्यही अद्‍भूत आहे.

बाली येथे विविध धर्माचे लोक वास्तव्य करीत आहे. येथील समुद्र किनारे पर्यटकांना आकर्षित करणारे केंद्रबिंदू आहेत. येथील बीच्यावरील पांढर्‍या वाळूवर हिंडण्यासाठी व अंगावर येणार्‍या समुद्री लाटांशी खेळण्यासाठी पर्यटक येथे हिवाळा व उन्हाळ्यात दाखल होत असतात. जलक्रीडेचा आनंद पर्यटक मोठ्या संख्येने लुटताना दिसतात.

सानूर बी
येथील सानूर बीच्यावर पर्यटकांना जलक्रीडा तसेच समुद्रावर पॅरासेलिंग करता येते. बीच्यावर येथील कलात्मक वस्तू मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतात. तसेच रंग-बिरंगी कपडेही पर्यटकांचे लक्ष केंद्रित करतात. शांत समुद्र व चंद्राच्या मंद प्रकाशात संध्याकाळ घालवण्यासाठी पर्यटक येथे धम्माल करण्यासाठी येत असतात.

तुलांबेन
उत्तर समुद्र किनार्‍यावर अगंग पर्वतावर तुलांबेन हे गाव आहे. तुलांबेन परिसर 'लिबर्टी रेक साईट' मध्ये मोडला जातो. येथे समुद्र तळापर्यंत
गोताखोरी केली जाते. उंच पर्वतावरून फेसाळत पडणारे पाणी पाहण्यासाठी पर्यटक गुनुंग अगुंग तसेच सेराया पर्यंत चढून येतात व नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटतात. येथील रंग-बिरंगी फुले मनाला मोहून टाकतात.
WD
WD


कुटा बीच्यावर पर्यटकांच्या मनोरंजनासाठी रिसोर्टमध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. येथे पर्यटकांसाठी संगीत
कार्यक्रम, आधुनिक नृत्य कार्यक्रमातून वेगळी अशी मेजवानी दिली जात असते. येथे नाइट क्लब तसेच पबही आहेत.

कसे पोहचाल?
कोणत्याही देशातील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देनपासार-नरूगा आंतर्राष्ट्रीय विमान तळावर उतरू शकतात. विमानतळापासून शहरात
येण्यासाठी बसेस तसेच खाजगी वाहन सहज उपलब्ध होत असते.