शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. देश-विदेश
Written By वेबदुनिया|

पर्यटनस्थळे खुणावू लागली

मौसम भी है, मौका भी है

WD
भटकंतीची हौस कुणाला नसते? वर्षभराच्या त्याच त्याच रूटींगलाईफ मधून थोडा 'रिलीफ' मिळण्यासाठी उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्टीचे निमित्त असते नाही कां. आता उन्हाळ्याची सुट्टी थोड्याच महिन्यात लागणार म्हटलं की, पर्यटनप्रेमींची पाय जाग्यावर थांबत नाहीत. म्हणूनच सुट्टी लागण्यापूर्वीच प्लॅनिंग सुरू झालंय. यंदाची ट्रीप 'मिस' होऊ नये म्हणून आपल्या मनपसंत टूरचे लागलीच बुकींगही केले जातंय.

WD
दरवर्षीच्या तुलनेत यंदा जेवढा पर्यटकांमध्ये उत्साह आहे तितकाच उत्साह त्यांना सफर घडवून आणणा-या ट्रॅव्हल कंपन्यांमध्ये दिसून येतोय. म्हणूनच अगदी कन्याकुमारी पासून दिल्लीपर्यंत भारताच्या कानाकोप-यात टूर्सचे आयोजन करण्यात आलाय. 'तुम्ही फक्त ठिकाण ठरवा, बाकी सारं आम्हावर सोपवा' म्हणत विविध पर्यटन कंपन्यांनी भरगच्च सहलींची पॅकेज देऊ केली आहेत. तर काहींनी सहलीची संकल्पना बदलत काहीतरी हटके डेस्टिनेशन टूर्सचे आयोजन केलंय. थंड हवेची ठिकाण, रुपेरी वाळूचे समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे, गडदुर्ग, गर्द झाडीची अभयारण्ये असे आवडीनिवडीनुसार सहली आखल्या जात आहेत. आता ट्रीप म्हटलं की खाद्ययात्राही आलीच म्हणून पर्यटकांच्या स्वागतासाठी हॉटेल्सनीही वर्षभराची मरगळ झटकली आहे.हल्ली 'पॅकेज' जमाना आहे. ही संकल्पना भटकंतीमध्येही आली आहे. पर्यटक, भक्तगणांना जमवून टूर-यात्रा काढणा-या ट्रॅव्हल कंपन्यांनी आता पॅकेज सिस्टिम सुरू केलीय. निसर्गसौदर्याने नटलेल्या महाराष्ट्रासह भारताच्या कानाकोप-यात टूर्स निघत आहेत.

चौधरी यात्रा कंपनीने यंदा तीर्थक्षेत्रावर भर दिला आहे. याबाबत माहिती देताना संचालक ब्रिजमोहन चौधरी यांनी सांगितले की, दक्षिण भारत, तिरूपती, गोवा, कोकणदर्शन, आग्रा, मथुरा, कुरुक्षेत्र, त्रिस्थळी, खजुराहो, काशी, अलाहाबाद, वैष्णोदेवी, दार्जिलिंग, नेपाळ अशा सामुदायिक यात्रांबरोबरच स्वतंत्र यात्रांचे आयोजन केले आहे. कंपनीला मोठी परंपरा असल्याने पर्यटक विश्वासाने बुकींग करत आहेत.

WD
'मौसम भी है, मौका भी है' अशी साद घालत केसरी टुर्सने फॉरेन टूर्सचे आयोजन केले आहे. या सहली 7 ते 15 दिवसांच्या आहेत. यामध्ये सिंगापूर, थायलंड, मलेशिया, हॉगकॉंग, बॅकॉक पट्टाया अशी ठिकाणे आहेत. गुरूनाथ ट्रॅव्हल्सने दक्षिण भारत, केरळ, नेपाळ, दार्जिलिंग, काशी त्रिस्थळी, राजस्थान, चारधाम, कोस्टल कर्नाटक अशा लांब पल्ल्यांच्या सहलींचे आयोजन केलय.

डेस्टिनेशनची नवी संकल्पना मांडत आराधना टूर्सने अनोख्या ठिकाणच्या सहली आयोजीत केल्या आहेत. याबाबत माहिती देताना संचालक केदार किराणे यांनी सांगितले, पूर्वांचल - सेव्हन सिस्टर्स, भतान-सिक्कीम-दार्जिलिंग, केरळ, कॉल ऑफ द वाईल्ड (कान्हा, बांधवगड), इजिप्त, व्हिएटनाम कंबोडिया, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड-टास्मानिया, साऊथ अमेरिका, केनिया-साऊथ आफ्रिका अशा ठिकाणी सहलींचे आयोजन केले आहे. वेगळी संकल्पना दिल्याने पर्यटक आकर्षित होत असून दरवर्षीइतकाच प्रतिसाद मिळतो आहे.