गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. देश-विदेश
Written By वेबदुनिया|

बेलग्रेड दी व्हाईट सिटी!

PR
बेलग्रेड हे शहर सर्बियाची राजधानी आहे. हे शहर आग्नेय युरोपात साव्हा व डॅन्यूच नद्यांच्या संगमाजवळ, बाल्कन द्विपकल्पावर वसलेले आहे. या शहराला त्याचा आकर्षक भौगोलीक रचनेमुळे दिले गलेले 'गेटवे ऑफ बाल्कन'हे नाव उचितच ठरते. बेलग्रेड हे सर्बियाचीच नव्हे तर तेथील सांस्कृ‍ती, शिक्षण, शाख व अर्थकारणाची राजधानी आहे.

त्याच्या उग्र अशा इतिहासामुळे बेलग्रेड हे अनेक शतकांपासून असंख्य विविध राजकारणांचे माहेरघर राहिलेले आहे. रोमन साम्राज्याच्या काळात वाला सिंगीड्युनम असे म्हटले जायचे व त्यानंतर बरेच वर्षानंतर त्याचे नाव बदलून बेलग्रेड दी व्हाईट सिटी असे ठेवले गेले. ज्या सुंदर व शुभ्र पांढर्‍या दगडांपासून या शहरातील इमारतींची निर्मिती केली त्यावरूनच त्याचे व्हाईट सिटी असे नाव पडले. जेव्हा तुम्ही या शहरात भेटीसाठी जाल तेव्हा त्याचा आत्मा व इतिहास यापासून तुम्ही नक्कीच भारावून जाल. सर्बियाच्या लोकांना त्यांच्या इतिहासाचा खुप अभिमान आहे. या शहराच्या भौगोलीक संमीश्रणासारखे दुसरे शहर जगात क्वचितच कुठे असेल।