गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. देश-विदेश
Written By वेबदुनिया|

म्हैसूर पॅलेस

WD
म्हैसूर पॅलेस म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणारा आहे. चामुंडा पर्वतावरील चामुंडेश्वरी देवीच्या चक्क पाठी असणारा हा म्हैसूर पॅलेस म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना. 1897साली मूळ लाकडी पॅलेस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर मद्रास स्टेटच्या वास्तुविशारदाकडून 1912मध्ये नवीन पॅलेस बांधण्यात आला.

'अंबा विलास' पॅलेस म्हणून तो ओळखला जाऊ लागला. दसर्‍याच्या समारंभाच्या वेळी म्हैसूरला जाण्याचा योग आला तर दसर्‍यासाठी खास प्रदर्शन मांडण्यात येणार्‍या 'वडेयार' राजवटीतील हिरे-माणकांनी सजवलेलं सिंहासन पाहण्यासाठी संधी मिळू शकते. या पॅलेसमध्ये कोणताही कॅमेरा नेण्यास बंदी आहे, परंतु बाहेरून छायाचित्रं घेता येतात.