गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. देश-विदेश
Written By वेबदुनिया|

वृंदावन गार्डन

WD
म्हैसूर शहराबाहेरील कृष्णराजा सागर डॅमवर बांधण्यात आलेलं जगप्रसिद्ध 'वृंदावन गार्डन'हे नेहमीच पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण असतं. अतिशय भव्य व विस्तीर्ण असं हे गार्डन सुंदर फुलांनी व ताटव्यांनी सजवण्यात आलं आहे. डॅमच्या वाया जाणार्‍या पाण्याचा कारंजांसाठी ‍अतिशय कल्पकतेने वापर करण्यात आला आहे. म्युझिकल फाऊंटन व अंधारातील रोषणाई ही आता महाराष्ट्रातील पैठरसह अनेक ठिकाणी अमलात आली आहे, परंतु भारतात प्रथम याचा वापर याच वृंदावन गार्डनमध्ये केला गेला.

WD
वृंदावन गार्डन पाहण्यासाठी सूर्यास्ताच्या एक तास आधी तेथे पोहोचणं आवश्यक आहे. त्यामुळे संपूर्ण गार्डन नीट पाहता येतं व त्यानंतर अंधार पडल्यावर विद्युत रोषणाईचा नयनरम्य सोहळा शांतपणे अनुभवता येतो. गार्डनच्या आत कोणताही मूव्ही कॅमेरा नेता येत नाही. या गार्डनमध्ये लाइटिंगचा सोहळा संपल्यानंतर अंधारात माणसांचे लोंढे बागेच्या बाहेर पडतात. त्यामुळे साहजिकच खिसापाकीट व लहान मुलं यांची विशेष काळजी घेतलेली बरी. गार्डनमध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ सहज प्रमाणात उपलब्ध आहेत.