शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. देश-विदेश
Written By वेबदुनिया|

शिकारा भ्रमण!

WD
जम्मू-श्रीनगर हे निसर्गसौंदर्याने नटलेले हिलस्टेशन. उंचच उंच पाईन्स व देवदार वृक्षांनी आच्छादितं असणारा हा परिसर आहे. श्रीनगरला जाताना दिसणारी केशरची शेती, पाईन्सची झाडे आणि पावलापावलावर आपली सुरक्षा करण्यासाठी असणारे आपले जवान हे चित्र येथे सर्वत्रच दिसते.

या महामार्गावरील आणखी एक आकर्षण म्हणजे जवाहर बोगदा. यातून जाण्याची मजा एकदा तरी अनुभवायला हवी. आता, तुम्ही जर काश्मीरचमध्ये आलात तर बर्फातील पर्यटन तर करायलाच हवे. काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याने सर्वांनाच भुरळ घातली आहे. येथील सौंदर्य मनाला अलगद स्पर्शन जाते. डल लेक मधील शिकारा भ्रमण हे इतर कुठल्याही बोटींग पेक्षा कधीही आनंददायक वाटते. डल लेकच्या हाऊसबोटीमध्ये राहण्याची व्यवस्था करता येते. संपूर्ण श्रीनगर हे बागा आणि सरोवरांनी बहरलेले आहे. त्याचबरोबर येथील अजून ऐक आकर्षण म्हणजे शिकारा आणि डल सरोवर.

WD
शिकार्‍यातून येथील नागरिकांचा प्रवास, लहान मुलांचे शाळे जाणे हे तर या भागातील रोजचेच चित्र. येथे असणारी पाण्यावर तरंगणारी शेती पाहिली की आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. या शिकार्‍यातून येथील नागरिक लोकरीचे कपडे, काश्मिरी दागिने, केशर विक्री करतात. येथील तरंगत्या बाजारात शाली, अक्रोड, केशर, दागिने अशा वस्तू विकायला असतात. हे पाहताना खूप गंमत वाटते.