शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. देश-विदेश
Written By वेबदुनिया|

ऐतिहासिक ग्वाल्हेर

NDND
गोपालचलपासून शंभर मीटर अंतरावर ग्वाल्हेर किल्ला आहे. पंधराव्या शतकात महाराजा मानसिंग यांनी हा किल्ला बांधला. किल्ल्याची उंची दहा फूट असून तीन एकरच्या परिसरात हा किल्ला आहे. किल्ल्यात प्रवेश करताच तीन मंदिर, सहा महाल आणि स्विमिंग पूल आहे. उत्तर भारतात ग्वाल्हेर किल्ला अतिशय सुरक्षित किल्ला मानला जातो.

राजपूतांनी ग्वाल्हेरमध्ये बांधलेल्या अनेक ऐतिहासिक इमारती, स्मारके, किल्ले, भवन महालांच्या रूपात आहेत. राजा महाराजा, कवी, शूरवीरांचे हे शहर आता आधुनिक व आर्थिक क्षेत्रांच्या विकसित रूपात दिसत आहे.

NDND
तोमर, मुगल आणि मराठ्यांनी या किल्ल्याची निर्मिती केली. या किल्ल्याच्या आतील भागात आपल्याला बरीच मंदिरे दिसतात. या मंदिरात हजारो भक्त दर्शनासाठी येतात. तसेच, तेलीचे मंदिर नवव्या श‍तकात द्रविड वास्तुशिल्पापासून प्रभावित होऊन बनविले आहे.

ग्वाल्हेर किल्ल्यात विविध प्रकारचे महाल असून त्यात करण महाल, जहाँगीर महल, शाहजहाँ मंदिर आणि गुरजरी महल यांचा समावेश आहे.

ग्वाल्हेर किल्ल्याजवळील प्रेक्षणीय स्थळे-
जय विलास महल व संग्रहालय:
ग्वाल्हेरमध्ये सन 1809 मध्ये बनविलेला जय विलास महाल आकर्षक व सुंदर आहे. या महालात ग्वाल्हेरचे महाराजा वास्तव्यास होते. महालातील 35 खोल्यांचे संग्रहालयात परिवर्तन केले आहे. या संग्रहालयातील सुसज्ज भवनात इटालियन संस्कृती आणि वास्तुशिल्पाची झलक पाहायला मिळते.
NDND
सूर्य मंदिर -
मोरारजवळ असलेले सूर्य मंदिर ओरीसातील कोणार्क मंदिरापासून प्रेरीत होऊन बांधले आहे.

तानसेन स्मारक -
तानसेन हे शास्त्रीय संगीताचे महान संगीतकार होते. अकबराच्या नऊ रत्नांपैंकी एक असलेल्या तानसेनच्या जीवनाचा अंतही ग्वाल्हेरमध्येच झाला. येथे त्यांचे स्मारक बनविण्यात आले आहे.

तेली मंदिर-
आठ ते अकराव्या श‍तकात निर्माण केलेले हे मंदिर भगवान विष्णूला अर्पण केले असून त्याकाळातील वास्तुशिल्प, मंदिर आणि इमारतींची झलक दिसून येते.
NDND

गुरुद्वारा डाटा बंद्धी चोद्ध-
गुरु हरगोविंद यांच्या स्मृतीनिमित्त बनविलेल्या या गुरूद्वारात हजारो भक्त दर्शनासाठी येतात. येथे ग्वाल्हेरच्या प्राचीन वास्तुशिल्पाची एक झलक दिसते. गुरजरी महाल सोळाव्या शतकात बनविला होता. तसेच, पंधराव्या शतकात बनविलेले मान मंदिर, आठव्या श‍तकात बनविलेला सुर्य-कुंड हेही पाहण्यासारखे आहेत. किल्ल्यात प्रवेश करताक्षणीच तेथील उरबई प्रवेशद्वारात जैन तीर्थंकारांना पाहू शकता. महलांचे प्रवेशद्वार सकाळी आठ ते संध्याकाळी पाचपर्यंत उघडे असते. हा किल्ला पहाण्यासाठी नोव्हेंबर ते जानेवारी महिन्याचा कालावधी उत्तम आहे.

कसे पोहचाल?
हवाईमार्ग-
ग्वाल्हेरजवळच विमानतळ असून येथे आपण मुंबई, दिल्ली, इंदुर येथून येऊ शकता.

रेल्वेमार्ग-
ग्वाल्हेरमध्येच रेल्वे स्टेशन आहे. ग्वाल्हेर, दिल्ली-मुंबई, दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावर आहे.

रस्तामार्ग-
आग्रा, दिल्ली, भोपाळ जाणार्‍या महामार्गाने ग्वाल्हेरला पोहचता येते.