शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. देश-विदेश
Written By वेबदुनिया|

डलहौसी शहर

WD
पठाणकोटपासून 80 कि.मी. अंतरावर 1854 मध्ये ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड डलहौसीने वसवलेलं 2039 मीटर उंचीवरचं हे शहर. पाच टेकड्यांच्या सभोवताली देवदार नि ओक वृक्षांनी नटलेलं हे थंड हवेचं रम्य ठिकाण आहे. इथून 22 कि.मी. वर खज्जिवार येथे सुवर्णकळस असलेलं मंदिर आहे.

पाईन वृक्षांनी वेढलेले तलाब आहते. सातदारा येथे औषधीयुक्त सात झरे वाहत असतात. तिबेटियन संस्कृतीशी मेळ घेत असलेली दगडाची धरं आरि काही रिसॉर्ट येथे आहेत. इथून 2 कि. मी. असलेल्या सेंट पीटर चर्चमध्ये एकाच वेळी 300 माणसं प्रार्थना करू शकतात. 1909 साली दगडांनी बांधलेलं हे चर्च अजूनही उत्तम स्थितीत आहे.