गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. देश-विदेश
Written By
Last Updated : बुधवार, 4 जून 2014 (17:17 IST)

मसुरी : निसर्गाचा अप्रतिम आविष्कार

उत्तर प्रदेश राज्याचे विभाजन करून उत्तरांचल या नव्या राज्याची निर्मीती झाली. उत्तरांचल या राज्याला ‘मसुरी’ ही निसर्गसौंदर्याची खाण भेट मिळाली.

गढवाल मंडल आणि कुमाऊ मंडल असे या राज्याचे दोन महत्त्वपूर्ण भाग आहेत. गढवाल मंडल मध्ये दहा पर्यटनस्थळे आहेत. त्यापैकी मसुरी हे प्रमुख स्थळ आहे. निसर्गाचा अप्रतिम आविष्कार मसुरीमध्ये अनुभवास येतो.

मसुरी हे स्थळ ‘पहाडोंकी रानी’ म्हणजेच पर्वतांची राणी म्हणून प्रसिद्ध आहे. हिमालयाच्या कुशीत 2005 मीटर उंचीवर मसुरी हे गाव वसले आहे. हे गाव ज्या टेकडीवर वसले आहे तिच्या आकार इंग्रजी सी सारखा आहे. टेकडीच्या उत्तर भागातून हिमालय तर दक्षिण भागातून द्रोणस्थलीचे विहंगम दर्शन घडते.

मसुरी पर्यटन स्थळाचा शोध 1827 मध्ये कॅप्टन यंग याने लावला. पूर्वी येथे मसुराची भरपूर रोपे होती. त्यावरून या गावाला ‘मसुरी’ हे नाव पडले. या गावाला ‘डेहराडूनचे छत’ असे म्हणतात. मसुरीत प्रथम लंढोर बाजार बसवला गेला. त्यानंतर त्याच्या  इतरत्र विस्तार झाला. उन्हाळ्यात   देखील येथील वातावरण थंड असते.

मसुरी परिसरात पाच महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळे अथवा प्रेक्षणी स्थळे आहेत. पुढे पहा : 
गनहिल - ब्रिटीशांनी आपल्या राजवटीत या डोंगरावर एक गन (तोफ) ठेवली होती. बारा वाजता ही तोफ डागली जात असे. म्हणून या टेकडीला गनहिल (तोफ टेकडी) हे नाव पडले.
1  कँप टी फॉल - मसुरी-यमनोत्री मार्गावर मसुरीपासून 5 कि. मी. ‘कँप टी फॉल’ हा धबधबा आहे. या धबधब्याला 5 जलधारा आहेत. समुद्रसपाटीपासून 500 फूट उंचीवरचा हाधबधबा अतिशय रम्य आणि प्रेक्षणीय आहे. त्याच्या चहुबाजूंनी डोंगररांगा आहेत. 
लेक मिस्ट - हा एक तलाव आहे. तलाव परिसरात धुके साठते. म्हणून याला ‘लेक मिस्ट’ असे म्हणतात.
मुनिसिपल गार्डन - पूर्वी हे उद्यान ‘बोटॅनिकल गार्डन’ म्हणून ओळखले जात असे. प्रसिद्ध भूशास्त्रज्ञ डॉ. एच. फाकनर लोगी यांनी या उद्यानाची निर्मिती केली. उद्यान प्रेक्षणीय आहे.
तिबेटी मंदिर - हे तिबेटी मंदिर बौद्ध संस्कृतीचे प्रतीक असून पर्यटकांचे मन आकर्षून घेते. या मंदिराच्या मागील बाजूस ड्रम्स (नगारे) बसवण्यात आले आहेत. निसर्गसौंदर्याने नटलेला हा परिसर आहे.