शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

जोधा अकबर ही प्रेमकथा-ह्रतिक

IFMIFM
हृतिक रोशनच्या मते 'जोधा अकबर' ला ऐतिहासिक चित्रपट म्हणणे चुकीचे आहे. हा चित्रपट म्हणजे एक प्रेमकथा आहे. याआधी आशुतोष गोवारीकरनेही या चित्रपटाबद्दल हेच म्हटले आहे.

ऐतिहासिक चित्रपट असा प्रचार झाल्यास तरुण वर्ग या चित्रपटाके फिरकणार नाही, अशी भीती या मंडळींना वाटते आहे. चित्रपट बघणार्‍यांत याच वर्गाची संख्या जास्त आहे. यामुळे हा चित्रपट प्रेमकथा आहे, असा प्रचार केला जात आहे. चित्रपटाची भाषा फारच साधी व सोपी आहे. यात हिंदी किंवा उर्दूतील कठिण शब्दांचा कुठेही वापर केलेला नाही. असेही ते स्पष्ट करतात.

अकबराची भूमिका मिळाल्यामुळे ह्रतिक खुशीत आहे. याआधी अकबराची भूमिका करून लोकप्रिय झालेल्या पृथ्वीराज कपूर यांच्याशी आपली तुलना करू नये अशी विनंती तो करतो. भूमिका प्रभावी करण्यासाठी त्याने अकबरावरील पुस्तके वाचली. ही भूमिका साकारताना त्याला बरीच मदत झाली. पण याचे श्रेय तो आशुतोष गोवारीकरला देतो. आशुतोषने सांगितल्याप्रमाणेच अभिनय केल्याचे तो कबूल करतो. 15 फेब्रुवारीला प्रदर्शित होणारा हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची त्याला खात्री आहे.