शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

सैफचे प्रेमासाठी वाट्टेल ते

IFMIFM
करीना कपूर रागावणार नाही याची पूर्ण काळजी सैफ अली खान घेतो. करीना रागावेल असे कोणतेच काम तो करू इच्छित नाही. तिच्या आवडी-निवडी तो प्रत्येकवेळी ध्यानात घेतो.

नुकत्याच एका पुरस्कार वितरण कार्यक्रमात याचा प्रत्यय आला. सैफला त्या समारंभात नृत्य सादर करायचे होते. 'रेस' या आगामी चित्रपटासह त्याच्यावर चित्रित न झालेल्या गाण्यांवरही त्याने नृत्य सादर केले. पण 'जब वुई मेट' यातील 'मौजा ही मौजा' हे गाणे वाजायला सुरुवात झाली तेव्हा त्याने या गाण्यावर नृत्य करण्यास नकार दिला.

सुरवातीला या मागील कारण कोणालाच कळले नाही. पण थोड्यावेळाने खरी गोम लक्षात आली. चित्रपटात हे गाणे शाहिद कपूरवर चित्रित झाले असून तो करीनाचा माजी प्रियकर आहे.

आता करीनाच्या जीवनातील शाहिदची जागा सैफने घेतली आहे. आणि करीनाला शाहीदची आठवण येईल असे कृत्य करणे सैफ टाळतो. सैफच्या नकारामागील हे कारण लक्षात आल्यानंतर प्रेमासाठी वाट्टेल ते करणार्‍या सैफची दया आली.