शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 फेब्रुवारी 2016 (11:48 IST)

लीलू.. सनी ज्याच्यावर सर्वाधिक प्रेम करते!

आधीची पॉर्न स्टार आणि आता बॉलिवूडची बेबीडॉल म्हणून ओळख निर्माण करणारी सनी लिऑन खरंतर नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या सिनेमावरुन, तर कधी तिच्या एखाद्या आवडी-निवडीवरुन. मात्र, आता सनी लिऑन चर्चेत आली आहे तिच्या प्रेमावरुन. अर्थात तिचं हे प्रेमही जरा हटकेच आहे. सनी लिऑनने तिच्या टिटर हँडलवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरुन आता सनी चर्चेत आली आहे. सनीचा पाळीव कुत्रा लीलूचा फोटो शेअर केला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये सनी लिऑनने लिहिलं आहे की, मी माझ्या या लहानग्या लीलूवर खूप खूप प्रेम करते.