आम्हाला मीडिया ट्रायलची गरज नाही; शिल्पा शेट्टीचे जाहीर निवेदन

shilpa raj
Last Modified सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (14:59 IST)
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेल्या अनेक दिवसांपासून पती राज कुंद्रामुळे खूप चर्चेत आली आहे.राज कुंद्राला १९ जुलै रोजी अश्लील चित्रपट बनवल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर शिल्पा शेट्टीबद्दल अनेक बातम्या समोर येत होत्या. त्यानंतर आज, प्रथमच तिने आपले मौन मोडत या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
राज कुंद्राला मुंबई गुन्हे शाखेने १९ जुलै रोजी या प्रकरणात अटक केली होती, ज्याला त्याच्या वकिलांनी बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. राज कुंद्राची अटक बेकायदेशीर आहे, या युक्तिवादाला उत्तर देताना सरकारी वकील अरुणा पै यांनी न्यायालयाला सांगितले की, राज कुंद्राच्या अटकेचे खरे कारण या प्रकरणाचे पुरावे नष्ट करणे हे आहे.राज कुंद्राचे आयटी प्रमुख रायन थोर्पे यांनाही पुरावे नष्ट केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.
शिल्पा शेट्टीने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘हो! गेले काही दिवस आव्हानात्मक होते, प्रत्येक गोष्टी. खूप अफवा आणि आरोप झाले आहेत.माध्यमांनी आणि (नसलेल्या) हितचिंतकांनी माझ्यावर बर्‍याच अनावश्यक टिपण्या केल्या.

बरेच ट्रोलिंग/प्रश्न विचारले…फक्त मलाच नाही तर माझ्या कुटुंबालाही.माझा स्टँड…मी अद्याप कोणतीही कमेंट केलेली नाही.आणि या प्रकरणात असे करणे टाळत राहीन, कारण ते न्यायालयीन प्रकरण आहे, म्हणून कृपया माझ्या वतीने खोटे कोट देणे थांबवा.
एक सेलिब्रिटी म्हणून “कधीही तक्रार करू नका, कधीही खुलासा देऊ नका” या माझ्या तत्त्वज्ञानाची पुनरावृत्ती करेन. मी एवढेच म्हणेन की, ही चालू असलेली तपासणी न्यायालयीन असल्याने मला मुंबई पोलीस आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.

एक कुटुंब म्हणून, आम्ही आमच्या सर्व उपलब्ध कायदेशीर उपायांचा अवलंब करत आहोत. पण, तोपर्यंत मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते – विशेषत: आई म्हणून – माझ्या मुलांच्या भविष्यासाठी आमच्या प्रायव्हसीचा आदर करा आणि तुम्हाला विनंती करते की, सत्यता पडताळल्याशिवाय अर्धवट माहितीवरून वक्तव्य करण्यापासून दूर राहा.
कायद्याचे पालन करणारी एक भारतीय नागरिक आहे आणि गेली 29 वर्षांपासून खूप मेहनतीने काम करत आहे. लोकांनी नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि मी कोणालाही निराश केलेले नाही.
तर,सर्वात महत्त्वाचे म्हणजे,मी तुम्हाला विनंती करतेकी, या काळात माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या प्रायव्हसीच्या अधिकाराचा आदर करा.आम्हाला मीडिया ट्रायलची गरज नाही. कृपया कायद्याला मार्ग दाखवू द्या.
सत्यमेव जयते!
– शिल्पा शेट्टी कुंद्रा’


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

अनन्या पांडेने तिचे प्रेम उघड केले असून फोटो शेअर केले

अनन्या पांडेने तिचे प्रेम उघड केले असून फोटो शेअर केले
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या आगामी 'लाइगर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त ...

सिमलीपाल नेशनल पार्क Simlipal National Park

सिमलीपाल नेशनल पार्क Simlipal National Park
सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान हे ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात स्थित एक प्रमुख व्याघ्र प्रकल्प ...

बंड्याचे ज्ञान :गप्पा करतील

बंड्याचे ज्ञान :गप्पा करतील
गुरूजी : एक बाई एका तासांत 50 पोळ्या बनवत असेल, तर, तीन बायका एका तासांत

83 Teaser: रणवीर सिंगने कपिल देवचा शानदार कॅच रीक्रिएट ...

83 Teaser: रणवीर सिंगने कपिल देवचा शानदार कॅच रीक्रिएट केला, वर्ल्ड कपच्या आठवणी ताज्या झाल्या
भारताच्या ऐतिहासिक विजयावर आधारित 83 चित्रपटाचा टीझर आज रिलीज झाला आहे. या चित्रपटात ...

या 5 ठिकाणी पाणी नेहमीच असतं गरम, कुणालाही कळू शकले नाही ...

या 5 ठिकाणी पाणी नेहमीच असतं गरम, कुणालाही कळू शकले नाही रहस्य
1. यमुनोत्री कुंड: उत्तराखंडमधील यमुनोत्री नदीजवळ बांधलेले यमुनादेवीचे मंदिर खूप ...