गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 20 जून 2015 (15:08 IST)

अर्जुन रामपाल घटस्फोटाच्या वाटेवर?

हृतिक आणि सुझान यांच्या घटस्फोटानंतर बॉलिवूडमधले आणखी एक दीर्घकाळापासून विवाहबंधनात अडकलेले जोडपे घटस्फोटाच्या मार्गावर आहे. अर्जुन रामपाल आणि पत्नी मेहर जेसिया परस्पर संमतीने घटस्फोट घेणार असल्याचे वृत्त आहे. मेहज ज्येष्ठ वकील मृणालिनी देशमुख यांच्याकडून सल्ला घेत असल्याची माहिती आहे. हृतिक रोशन आणि सुझान खान यांच्या घटस्फोटाला अर्जुन रामपाल जबाबदार असल्याच्य वावड्या कही महिन्यांपूर्वी उठल्या होत्या. त्यानंतर अर्जुन-मेहर काडीमोड घेणार असल्याच्या चर्चा होत्या. अर्जुन आणि सुझैन यांचे प्रेमसंबंध असल्याच्या अफवांनाही ऊत आला होता. अर्जुन रामपालने 1999 मध्ये माजी विश्वसुंदरी आणि सुपरमॉडेल जेसियाशी लग्न केले होते. अर्जुन मेहरला 13 वर्षांची महिका आणि 10 वर्षांची मायरा या दोन मुली आहेत.