शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 15 एप्रिल 2015 (09:52 IST)

अर्जुनसाठी बहिणीने गोंदवले टॅटू

शनिवारच ‘वर्ल्ड सिबलिंग डे’ निमित्त अर्जुन कपूरला एक खास गिफ्ट मिळाली आहे. अर्जुनची बहीण अंशुला कपूरने या खास दिवशी आपल्या भावाच्या नावाचा एक खास टॅटू गोंदवून घेतला आहे.

या टॅटूत एक अँकर आहे आणि त्यात अर्जुन असं लिहिलं आहे. टॅटूची ही छबी अंशुलाने आपल्या सोशल मीडियावरही पोस्ट केली आहे. त्याखाली लिहिलं आहे- ‘घर तेच असत, जिथे आश्रय असतो. हॅप्पी सिबलिंग डे! आयुष्याच्या प्रत्येक वादळात सावरलं आहेस, तू जेथे आहेस तेथे मी सुरक्षित आहे.’ या सगळ्यातून या भावा-बहिणीचं प्रेम किती आहे हे प्रतीत होते. अंशुला कपूर नेहमीच सोशल मीडियावर अँक्टिव असते. ती त्यावर तिथे आणि अर्जुनचे फोटोही शेअर करते. या फोटोत लहानपणापासून अत्तापर्यंतच्या आठवणी आहेत.

अर्जुन आणि अंशुला प्रोड्यूसर बोनी कपूरच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलं आहेत. श्रीदेवीसोबत लग्न केल्यानंतर बोनी कपूरने त्याची पहिली पत्नी मोनाला सोडचिठ्ठी दिली होती. मार्च 2012 मध्ये मोनाचं निधन झालं आहे. तेव्हापासून अंशुलाची जबाबदारी अर्जुनच्या खांद्यावर आहे.