शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 11 ऑगस्ट 2014 (11:53 IST)

आता हिंदीत पाहा पोश्टर बॉईज

अभिनेता निर्माता श्रेयस तळपदेने ‘पोश्टर बॉईज’ या चित्रपटाला महाराष्ट्रात मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता हा चित्रपट हिंदीमध्ये काढण्याचे ठरवले आहे. मराठीतील ‘पोश्टर बॉईज’ चित्रपटाच्या यशाबद्दल मीडिया आणि बॉलिवूडमधील अनेक मित्रांनी माझे कौतुक असून हा चित्रपट देशभरात पोहचण्यासाठी हिंदी भाषेतून काढण्याची विनंती केली आहे. श्रेयस तळपदे निर्मित या चित्रपटात शासनाच्या नसबंदीसाठी आवाहन करणार्‍या एका पोस्टरवर गावातल्या तीन तरुणांचा फोटो छापला जातो. त्यामुळे उडालेला गोंधळ आणि त्यातून निर्माण झालेला हास्यकल्लोळ या चित्रपटात पाहायला मिळतो.

दिलीप प्रभावळकर, अनिकेत विश्वासराव, हृषीकेश जोशी, पूजा सावंत आणि नेहा जोशी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. समीर पाटील यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. हिंदीतून चित्रपट निर्मिती करत असताना याच कलाकारांना पुन्हा घेणार का, असे विचारले असता त्याने याचे उत्तर आताच देणे शक्य नसल्याचे सांगितले. मात्र प्रेक्षकांच्या आवडीचा नक्की विचार करु असेही तो म्हणाला.