शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

आमिरनंतर आता शाहरुखही शिकतोय मराठी!

चंद्रकांत शिंदे

मनसे आणि शिवसेनेच्या मराठी ध्यासाचा धसका अख्ख्या बॉलीवुडने घेतला आहे. मनसेच्या तीव्र मराठी आंदोलनानंतर आमिर खानने मराठी शिकण्‍यास सुरुवात केली होती. त्यापाठोपाठ आता किंग खान अर्थात शाहरुख खाननेही आपल्यासह आपल्या मुलांनाही मराठी शिकवण्‍यास सुरुवात केली आहे.

शाहरुख प्रथमच गौरीसोबत एका जाहिरातील दिसणार असून, हिंदी भाषेच्या तुलनेत स्थानिक भाषांतील चित्रपट अधिक सरस असल्याची पावती यासाठी आयोजित करण्‍यात आलेल्या पत्रकारपरिषदेत शाहरुखने दिली आहे.

श्वास ऑस्करसाठी गेला होता, यावरुनच स्थानिक मराठी भाषेचे महत्व कळते असे त्याने म्हटले आहे.

आपल्यालाही स्थानिक भाषेतील चित्रपट पहाण्‍यास आवडतात, घरात माझी मुलं मराठीतच बोलातात व मी त्यांच्याकडून मराठी शिकण्‍याचा प्रयत्न करत असल्याचे किंग खानने मान्य केले आहे. मराठी चित्रपटात काम करण्‍याची आपल्याला जर ऑफर मिळाली तर आपण यात नक्कीच काम करु असे आश्वासनही त्याने दिले आहे.