बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 सप्टेंबर 2015 (11:02 IST)

आमिरला श्वास घेण्यास त्रास, नीट चालताही येत नाही

अभिनेता आमिर खान याला बॉलीवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हटलं जातं. सिनेमातील भूमिकेसाठी पूर्ण तयारी, परिपूर्ण अभ्यास इत्यादी गोष्टी काटेकोरपणे आमिर नेहमीच पाळतो. वेळप्रसंगी एखादी मोठी रिस्कही घेण्यास आमिर तयार असतो. आमिरची ही गुणवैशिष्ट्य बिग बॉस-8 चा विजेता अभिनेता गौतम गुलाटी याने इन्स्टाग्रामवर व्यक्त केली आहेत. 
 
गौतम गुलाटीने इन्स्टाग्रामवरील अकाउंटवरून आमिर खानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, या माणसाबद्दल मी वेगळं काय बोलावं? खूप वर्षानंतर मी आमिरला भेटलो आणि आम्ही एकाच फ्लाईटमध्ये होतो. आमिर खान ज्याप्रकारे इतरांचा आदर करतो, ते उल्लेखनीय आहे. गौतमने याच कॅप्शनमध्ये पुढे लिहिलं आहे की, दंगलमध्ये आपल्या भूमिकेसाठी आमिर खानने तब्बल 30 किलो वजन वाढवलं आहे आणि यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होतो आहे. शिवाय, आमिरला चालतानाही खूप त्रास होतो. 
 
मात्र, भूमिकेसाठी काहीही करणार्‍या आमिरची यातूनच कामाप्रती असलेली चिकाटी दिसते. भारतात असा कुणी आहे का जो या स्तरावर काम करतो?.. नाही भेटणार. कारण असा केवळ एकच व्यक्ती आहे, तो म्हणजे आमिर खान.